प्रतिनिधिक छायाचित्र  File Photo
सोलापूर

मारकडवाडीपाठोपाठ धानोरे ग्रामस्थांचा 'ईव्हीएम'वर आक्षेप; फेर मतदानाची मागणी

Solapur Election News | अन्यथा धानोरे ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर: पुढारी वृत्तसेवा: माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीपाठोपाठ धानोरे गावातील ग्रामस्थांनीही ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतला आहे. धानोरे गावात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांना ईव्हीएम मशीनवर पडलेल्या मतांपेक्षा हात वर करून घेण्यात आलेले मतदान अधिक आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी मशीनवरच आक्षेप नोंदवत निवडणूक आयोगाकडे फेर मतदान घेण्याची मागणी केली आहे.

धानोरे गावात उत्तम जानकर यांना ईव्हीएम मध्ये 963 मते पडली होती. तर हात उंचावून प्रत्यक्ष मतदान घेतल्यानंतर 1206 मते पडली. 243 मतांचा फरक पडला असल्याने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे. बॅलेट पेपरवर फेर निवडणूक नाही घेतली. तर धानोरे ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT