सोलापूर

Solapur news | महालक्ष्मी सरस प्रदर्शन : सोलापूर प्रथम

एकूण 14 स्वयंसहाय्यता समूहांच्या साहित्य विक्रीतून 91 लाखांचे उत्पन्न

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस प्रदर्शनात सोलापूर जिल्ह्यातील 14 स्वयंसहाय्यता समूहांनी सहभाग घेतला. त्यांच्या साहित्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत 91 लाख रुपये उत्पन्न मिळाले. ते राज्यातील सर्व बचत गटापेक्षा जास्त असल्याने महालक्ष्मी प्रदर्शनात सोलापूर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आला.

वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रात दि. 23 मार्च ते दि. 5 एप्रिल या कालावधीत राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस प्रदर्शन झाले. ग्रामीण महिलांच्या कौशल्याला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महालक्ष्मी सरस प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते, अशी माहिती प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप यांनी दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, जिल्हा व्यवस्थापक राहुल जाधव यांनी वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी नियोजन केले होते. त्याला यश आले.

मुंबईकरांना सोलापुरी स्वादाची भुरळ

या प्रदर्शनात सोलापूरच्या स्टॉल्सवर मुंबईकरांची खरेदीसाठी झुंबड होती. विशेषतः सोलापूरची कडक भाकरी, शेंगा चटणी, जवस चटणी, काळा मसाला, सांडगे, दही मिरची, सेंद्रिय ज्वारी, कडधान्ये आदी साहित्यांना मुंबईकरांनी अक्षरशः डोक्यावर घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT