सोलापूर : आ. अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली विधिमंडळ अंदाज समिती तीन दिवसांच्या सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आली आहे. गुरुवारी सकाळी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात समितीची बैठक झाली. रखडलेली कामे, अपूर्ण प्रकल्प आणि त्रुटींवर समितीच्या सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
समितीमध्ये २९ आमदारांचा समावेश आहे. पहिल्या दिवशी सुमारे १५ हून अधिक आमदारांनी शासनाकडून विकासकामांसाठी उपलब्ध झालेल्या निधीचा योग्य विनियोग झाला आहे का, कामांची गुणवत्ता, खर्चाचे नियोजन आणि मंजूर उद्देशानुसार निधीचा वापर झाला आहे का, याची तपासणी केली.
आज पाहणी, पुन्हा उद्या बैठक
आज शुक्रवारी (दि.२१) समितीतील आमदारांकडून जिल्ह्यातील निवडक विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. शनिवारी (दि. २२) अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन पाहणीदरम्यान आढळलेल्या बाबींवर चर्चा केली जाणार आहे.