कुंभारी शिवारात पैशाच्या व्यवहारातून एकाचा निर्घृण खून 
सोलापूर

Solapur Crime : कुंभारी शिवारात पैशाच्या व्यवहारातून एकाचा निर्घृण खून

दक्षिण सोलापूर तालुक्यातील घटना

पुढारी वृत्तसेवा

वळसंग : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी शिवारात पैशाच्या देवाण-घेवाणीतून एकाचा निर्घृण खून झाल्याची घटना घडली. दर्याप्पा गंगाधर काळे (५६) असे खून झालेल्याचे नाव आहे.

दर्याप्पा काळे यांनी काही वर्षांपूर्वी नीलेश आडगळे यांना पैसे दिले होते. ते पैसे मागण्यासाठी दर्याप्पा हे नीलेशकडे गेले होते. यावेळी दोघांमध्ये पैशावरून वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी संशयित नीलेश व त्याच्या साथीदारांनी मिळून बॅट आणि कुऱ्हाडीने दर्याप्पावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. डोक्याला जबर मार लागल्याने दर्याप्पा गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी सोलापूर शासकीय रुग्णालय पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT