मध्यवर्ती बसस्थानकावर दुचाकी पार्किंग 
सोलापूर

Solapur News : कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांना असुविधेचा त्रास

मध्यवर्ती बसस्थानकावर दुचाकी पार्किंग; बाकड्यांअभावी प्रवासी बसतात जमिनीवर

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : मध्यवर्ती बसस्थानकातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांना बसण्यासाठी बाकडे किंवा अन्य कोणतीच सुविधा नाही. यामुळे या प्रवाशांना जमिनीवर किंवा कट्ट्यावर बसून बसची वाट पहावी लागते.

येथे अनेक कर्मचारी आपली दुचाकी पार्क करत असल्याने प्रवाशांना थांबायला जागा मिळत नाही. पुरुष कट्ट्यावर व पार्क केलेल्या दुचाकींच्या सीटवर बसतात; पण महिलांची मात्र मोठी पंचाईत होते. काही वेळा उन्हातच थांबावे लागते. ही गैरसोय दूर करून बाकड्यांसह चांगले शेड निर्माण करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. कर्नाटकात जाणाऱ्या बसेस व प्रवाशांची सोय बसस्थानकाच्या बाजूला प्रवेशद्वाराजवळ केली आहे. येथे स्वच्छतागृहाची सोय नाही. त्यामुळे बसथांब्याजवळ दुर्गंधी आहे. बसमध्ये बसल्यानंतरही प्रवाशांना अनेक वेळेला नाकाला रुमाल बांधावा लागतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT