काडादी चाळीतील बाल्कनी कोसळली 
सोलापूर

Solapur News : काडादी चाळीतील बाल्कनी कोसळली

अडकलेल्या १८ जणांची अग्‍निशमन दलाकडून सुखरूप सुटका

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : रेल्वे स्टेशनसमोरील काडादी चाळ येथील पहिल्या मजल्यावरील बाल्कनीचा भाग अचानक कोसळल्याने दोन घरांमध्ये १८ जण अडकले. यामध्ये १४ महिला आणि चार पुरुषांचा समावेश होता. घटनेची माहिती मिळताच अग्‍निशमन दलाने धाव घेत दोन शिड्यांचा पूल तयार करून सर्वांची सुखरूप सुटका केली.

महापालिका अग्निशमन दलाला सायंकाळी ४.२३ वाजता घटनेची माहिती मिळाली. जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. बाल्कनीचा भाग कोसळल्याने नागरिकांसाठी बाहेर पडण्याचा मार्ग धोकादायक बनला होता. त्यामुळे जवानांनी दोन शिड्यांच्या साहाय्याने सुरक्षित मार्ग तयार केला आणि अडकलेल्या नागरिकांना एक-एक करून बाहेर काढले. ४७ मिनिटांत १८ जणांची सुखरूप सुटका करण्यात अग्‍निशमन दलाला यश आल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

मुख्य अग्‍निशमन अधिकारी राकेश साळुंके हे स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून बचाव मोहिमेवर लक्ष ठेवून होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही रेस्क्यू मोहीम पार पडली.यावेळी प्र. केंद्र अधिकारी श्रीकांत भडके, गौतम आव्हाड, रावसाहेब सलगर तसेच फायरमन पुष्कराज घुमे, स्वप्नील कांबळे, कल्याण धप्पाधुळे, शुभम मिरगुंडे, पंकज माळी, करण रजपूत आदी अग्‍निशमन दलाचे जवान या मोहिमेत सहभागी झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT