Job Fraud Pudhari
सोलापूर

Job Fraud: नोकरीच्या आमिषाने ९५ लाखाला गंडा

पुणे महानगरपालिकेत नोकरी लावण्याचे आमिष

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : पुणे महानगरपालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे सोलापुरातील व्यक्तीकडून तब्बल ९५ लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात शिवानंद बाळासाहेब पाटील (रा. कर्वेनगर, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीशैल अमोगसिद्ध नाईकवाडे (वय ५०, रा. अनुपम पार्क, सैफुल, विजापूर रोड, सोलापूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ मार्च २०२६ रोजी कामत हॉटेल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर येथे फिर्यादीची शिवानंद पाटील याच्याशी ओळख झाली. त्यानंतर पाटील याने श्रीशैल नाईकवाडी यांना पुणे महानगरपालिकेत उपआरोग्य अधिकारी, त्यांच्‍या पत्‍नी सुनीता वडेर यांना वैद्यकीय अधिकारी तसेच भाची कविता पुजारी यांना वरिष्ठ औषध निर्माता वर्ग-३ या पदांवर नोकरी लावण्याचे आमिष दाखवले.

फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या नावाची बनावट कागदपत्रे देण्यात आली. त्यानंतर रोख रक्कम तसेच बँकेच्या माध्यमातून वेळोवेळी ९५ लाख रुपये घेत आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सपोनि रायगोंडा करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT