निवडणूक Pudhari News Network
सोलापूर

Solapur Janata Sahakari Bank: जनता सहकारी बँकेसाठी 12 जण निवडणूक रिंगणात

सात जागा बिनविरोध : दहा जागांसाठी चुरस

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर जनता सहकारी बँकेच्या 17 संचालक मंडळापैकी सात जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर दहा जागेसाठी बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, जतना बँकेच्या 25 किलोमीटर क्षेत्राच्या आतील सभासदाची निवडणूक लागली आहे.

जनता बँकेच्या निवडणुकीसाठी 49 जणांचे 80 अर्ज दाखल झाले होते. त्यातील सहा जणांचे अर्ज अपात्र तर 43 जणांचे अर्ज वैध ठरले होते. त्यातील 31 जणांनी मंगळवारी (दि. 10) अर्ज मागे घेतले आहे. तर दहा जागेसाठी 12 जण इच्छुक असल्याने त्या जागेसाठी निवडणूक लागली आहे.

जनता बँक निवडणुकीसाठी 25 कि.मी. च्या आतमध्ये राहणाऱ्या 27 सभासदांनी 43, 25 कि.मी. क्षेत्राच्या बाहेरील 12 सभासदांनी 19, एससी, एसटीच्या चार जणांचे 11, सहा महिला सभासदांनी सात असे एकूण 80 अर्ज दाखल झाले होते. त्याची छाननी सोमवारी (दि.9) पूर्ण झाली आहे. तसेच मंगळवारी अर्ज 31 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहे. दहा जागेसाठी लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT