सोलापूर : जगाला अहिंसेचा मार्ग दाखवणारे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना अनेक दिवसापासून आचार्य शांतीसागर चौकातील (रंग भवन चौक) जैन धर्माचे श्रद्धास्थान कीर्ती स्तंभ अंधारात आहे. याकडे महापालिका सतत दुर्लक्ष करीत असल्याची खंत भारतीय जैन संघटनेचे श्याम पाटील यांनी व्यक्त केली.
कीर्ती स्तंभाच्या परिसरातील सर्व समस्यांचा तत्काळ निपटारा करण्याची मागणी उपाध्यक्ष अभिनंदन विभुते यांनी केली. यावेळी भारतीय जैन संघटनेचे श्याम पाटील, अभिनंदन विभूते, आस्था रोटीचे अनंद तालीकोटी सुहास चंचुरे, विक्रांत बशेट्टी, हिराचंद कासार, ओम पाटील यांनी केली आहे.
जैन बांधवांचे आक्षेप
जैन धर्माचे श्रद्धास्थान कीर्ती स्तंभ आहे. या स्तंभाची दुरवस्था झाली आहे. कुणीही याठिकाणी येतात आणि वाढदिवस साजरा करतात
कीर्ती स्तंभ परिसरात हल्ली कायमस्वरूपी घाणीचे साम्राज्य पसरलेले असून याकडे महापालिकेच्या संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे
कीर्ती स्तंभावरील ग्रॅनाईट उखडले असून त्याविषयी महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा करूनही ते बसवले जात नाही
सोलापूर शहरात बसविण्यात आलेले सर्व थोर पुरुषांचे पुतळे प्रकाशमय असून कीर्ती स्तंभ अंधारात आहे.
स्तंभाच्या जवळ सेक्युरिटी गार्ड नाही, सीसी कॅमेरे चालू नाहीत, याकडे आयुक्तांनी लक्ष द्यावे