इंचगाव टोलनाक्याजवळ १७ किलो गांजा जप्त 
सोलापूर

Solapur Crime : इंचगाव टोलनाक्याजवळ १७ किलो गांजा जप्त; जतचा तरुण अटकेत

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

कामती : सोलापूर-मिरज महामार्गावरील इंचगाव टोलनाक्याजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने स्विफ्ट कारमधून १७ किलो ९९४ ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत गांजा, कार व मोबाईल असा एकूण १५ लाख ७९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी शुभम लालासाहेब काळे (वय २८, रा. जत, जि. सांगली) याला अटक करण्यात आली.

केंद्र शासनाच्या नशामुक्त भारत मोहिमेंतर्गत सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार मनोज राठोड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे इंचगाव टोलनाक्याजवळ सापळा रचण्यात आला. कामतीकडून बेगमपूरच्या दिशेने येणारी संशयित स्विफ्ट कार (एमएच १० डी.क्यू. ८८९७) अडवून तपासणी केली असता, कारमधील पोत्यात ८ लाख ९९ हजार ७०० रुपये किमतीचा १७ किलो ९९४ ग्रॅम गांजा आढळला. पोलिसांनी कारमधील शुभम काळे याला अटक करत त्याच्याविरोधात कामती पोलिसांत गुन्हा दाखल केला. त्याने हा गांजा कोठून आणला आणि कुठे नेला जाणार होता, याचा तपास सुरू आहे.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय शिंदे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT