सोलापूर

Solapur News: घरकूलधारकांना मिळाली अवैध साठ्यातील वाळू मोफत

विकतही मिळत नसलेली वाळू अक्षरशः दहा घरकूल धारकांना मोफत देण्यात आली.

पुढारी वृत्तसेवा

कुर्डूवाडी : महसूल विभागाच्या माढा येथील कार्यालयात अवैध वाळू साठा असल्याबाबतचा फोन खणखणला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी कारवाई केली व विकतही मिळत नसलेली वाळू अक्षरशः दहा घरकूल धारकांना मोफत देण्यात आली.

माढा तालुक्याची हद्द असलेल्या परंतु परांडा तालुक्यात जमीन अललेल्या लव्हे (ता. माढा) या गावातील एकमेव गट नंबर ८५ ही फॉरेस्ट म्हणून नोंद असलेले दहा एकर जमीन आहे. जमिनीमध्ये सगळीकडे मोठी झाडी वाढल्याने या जंगलात सहसा कोणी जात नाही, याचाच फायदा घेत सीना नदीतून अनेक वाळू माफिया नदी पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या ठिकाणी वाळूचा साठा करत असतात. या ठिकाणाहून हजारो ब्रास वाळू आजपर्यंत या वाळूमाफियाने विकली आहे.

या ठिकाणी असाच ५० ब्रास वाळूचा साठा होता. याबाबतची माहिती एका प्रतिस्पर्ध्या वाळू माफियाने माढा तहसील कार्यालयाला फोनद्वारे कळवली. यानंतर तहसीलच्या भरारी पथकाने या ठिकाणी येऊन ५० ब्रास वाळूचा साठा असल्याची खात्री केली. या पथकातील अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी माढा यांना फोन करून घरकुलाला वाळू येथून मोफत देतो, लव्हे येथील लाभार्थ्यांची नावे पाठवा असे सांगितले. परंतु लव्हेतील ग्रामसेवक वारी बंदोबस्ताला गेल्यामुळे त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. यानंतर लगेचच अकुलगाव येथील ग्रामसेवकाने दहा जणांची घरकूल यादी महसूलला दिली व दहा लोकांना वाळू घेण्यासाठी पाठवून दिले.

हे दहा लोक टिप्पर व जेसीबी घेऊन आले असता काही वाळू माफियांनी वाळू घेण्यास मनाऊ करुन दम दिला. परंतु महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करायची धमकी दिल्यानंतर पन्नास ब्रास वाळू अक्षरशा जमिनीवरील वाळू खरडून हे दहा लाभार्थी प्रत्येकी पाच ब्रास या हिशेबाने घेऊन गेले. तहसीलदार संजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली महसूलचे बसवराज समदुर्ले, चोपडे, मोरे, माळी, राजेश पाटील, सुतार, संघपाल दणाने, मिलिंद गायकवाड यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT