सोलापूर

Solapur Crime: बनावट दारू कारखानाप्रकरणी आरोपी अटकेत

चिंचोळी एमआयडीसीतील प्रकार; दोन कोटींचा मुद्देमाल हस्‍तगत

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : मोहोळ हद्दीतील चिंचोळी एमआयडीसीत अवैध बनावट देशी दारु निर्मितीचा कारखान्यावर राज्‍य उत्‍पादन शुल्‍क खात्‍याने धडक कारवाई केली. बनावट दारु, लेबल, बुचे तसेच मशिनरी यासह दोन कोटी एक लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला. याप्रकरणी पाच जणांवर गुन्‍हा दाखल करण्यात आला असून त्‍यांना अटक करण्यात आली.

संतोष बाबूराव ढोकर (वय ४६, रा. सोलापूर रोड, बार्शी), धनराज अविनाश भोसले (वय २८, रा. पोखरापूर, ता. मोहोळ), महावीर विक्रम कदम (वय २९, रा. माडेगाव, ता. बार्शी), किशोर धेडुलाल सेलेकर (वय ४१, रा.बालाघाट, मध्यप्रदेश, सध्या चिंचोळी एमआयडीसी) आणि प्रदिप अवधेश यादव (वय २८, रा. आझमगढ, उत्‍तरप्रदेश, सध्या चिंचोळी एमआयडीसी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीत आरोपींची नावे आहेत. राज्‍य उत्‍पादन शुल्‍क खात्‍याने बुधवारी (दि.२९) चिंचोळी एमआयडीसीत धाड टाकली आणि हा प्रकार उघडकीस आला.

या बनावट कारखान्‍यामुळे शासनाचा ७० लाख ४० हजार रुपयांचा महसूल बुडाला. सदर कारवाईसाठी एमआयडीसी मधील भाडेतत्वावर घेण्यात आलेल्या गोडावूनचा वापर करण्यात आला होता त्‍यामुळे या जागेच्‍या मालकाला देखील सह आरोपी करण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाची आजपर्यंत सर्वात मोठी कारवाई आहे. सदर बनावट मद्याचा पुरवठा सोलापूरसह शेजारील बीड, लातूर, धाराशिव येथे करण्यात येत होता. या धाडीत चार चारचाकी वाहने तीन दुचाकी वाहने ताब्‍यात घेण्यात आली.

बनावट दारुचा साठा व मशिनरी, टँगो पंच बनावट देशी मद्याच्या ९० मि.ली.च्‍या ४१ हजार ३०० सिलबंद बाटल्या, भिंगरी देशी दारु ९० मि.ली. च्या दोन हजार बाटल्या, ६९ बॅरेलमध्ये १३ हजार ८०० लि. स्पिरीट, - ब्लेंड १२०० लि., बनावट प्लॅस्टीक बाटल्याचे ३२६ बॉक्स, विविध ब्रॅन्‍डचे एक लाख ६५ हजार बनावट लेबल, - विविध ब्रॅन्‍डचे एक लाख ३५ हजार बनावट बुचे, एक ऑटोमॅटीक बॉटलिंग मशिन, एक सेमी ऑटोमॅटीक बॉटलिंग मशिन, दोन स्मॉल इंजेक्ट प्रिंटर, पाच आरओ प्लांट, एक जनरेटर, चार इलेक्ट्रीक मोटर इ. साहित्य जप्‍त करण्यात आले.

सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त सागर धोमकर निर्देशानुसार, राज्य उत्पादन शुल्कचे अधिक्षक भाग्यश्री जाधव, उपअधीक्षक सौरभ अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जे.एन.पाटील,.ए.व्ही. घाटगे, आर. के. निंबाळकर,.डी. आर. पोवार,.ए.बी.सरवदे, एस.बी.सिद, .एस.बी. शेळके,.एस.डी. कांबळे, विकास थोरात, दिलीप सानप, अनिल पांढरे, चेतन वनगुंटी, प्रशांत इंगोले, गजानन ढब्बे, कपील स्वामी, आण्णा कर्चे, स्वप्नील आरमाळ, मंगेश मानसिंग, शेरखाने यांनी पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT