Murder Pudhari
सोलापूर

Solapur Crime : कोयत्याने हल्ला करून पत्नीचा खून

दारू पिण्याच्या कारणावरून वाद

पुढारी वृत्तसेवा

कामती : तुम्ही दारू पिलात, तर मी माझ्या आईकडे माहेरी जाईन, असे पत्नीने पतीला सांगितले. याच रागातून पतीने पत्नीवर कोयता आणि विटेने हल्ला चढवला. या हल्ल्यात जखमी झालेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मोहोळ तालुक्यातील कुरुल परिसरात घडली.

गायत्री यशवंत हेगडे (वय २३, रा. वडापूर, ता. दक्षिण सोलापूर, सध्या कुरुल, ता. मोहोळ, जि. सोलापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती यशवंत ऊर्फ आबू भारत हेगडे याच्याविरुद्ध कामती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुरुल ते कातेवाडी रस्त्यावरील बिरू मोटे यांच्या वीटभट्टीवर हेगडे दाम्पत्य राहत होते. २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास गायत्री हिने पतीला तुम्ही दारू पिलात, तर मी आईकडे जाते, असे सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. संतप्त यशवंतने गायत्रीला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर वीट आणि ऊस तोडणीच्या कोयत्याने तिच्या डोक्यात, चेहऱ्यावर तसेच डाव्या हातावर वार केले.

दारूच्या वादात जीव गेला

यशवंतला दारूचे व्यसन होते. या व्यसनाला पत्नी गायत्री कंटाळली होती. तिने नवऱ्याचे दारूचे व्यसन सुटावे, यासाठी प्रयत्न केले; पण उलट दारूच्या आहारी गेलेल्या यशवंतने कोयता व विटाने हल्ला करून तिचा जीव घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT