होटगी रोडबाबत आदेश रखडला 
सोलापूर

Solapur News : होटगी रोडबाबत आदेश रखडला

महानगरपालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : होटगी रोडवरील रस्त्याच्या कामातील गंभीर तांत्रिक त्रुटी समोर येऊनही त्यावर ठोस कारवाई होत नसल्याने महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ड्रेनेज आणि पाणीपुरवठा पाइपलाइन बाधित झाल्याने भविष्यात नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. मात्र त्रुटी दूर करूनच पुढील काम सुरू करा असे सांगणारा आवश्यक असलेला लेखी आदेश सोमवारीही निघाला नाही.

महापौर विनायक कोंड्याल यांनी या कामातील तांत्रिक त्रुटी तपासणे आणि त्या दूर करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना असल्याचे स्पष्ट केले आहे. पण त्या बैठकीचा इतिवृत्तांत अद्याप देण्यात आला नाही. तसेच नगर अभियंता कार्यालयाने तातडीने पाहणी करून अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. यापूर्वी झालेल्या बैठकीतही जबाबदारी निश्चित करण्याऐवजी अधिकाऱ्यांकडून एकमेकांकडे बोट दाखविल्याची चर्चा झाली होती.

प्रशासनाकडून एमएसआयडीसीला तोंडी सूचना देण्यात आल्या. मात्र लेखी आदेशाअभावी काम सुरूच आहे. आयुक्त लवकरच याविषयी लेखी आदेश देतील असे बोलले जात होते. मात्र सोमवार उलटूनही आदेश निघाला नसल्याने नागरिकांच्या तक्रारींचे गांभीर्य प्रशासनाला कितपत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. होटगी रस्त्यासंदर्भात महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आहे. मात्र या बैठकीचा इतिवृत्तांत आयुक्तांकडे देण्यात आलेला नाही. यामुळे आयुक्तांनी लेखी आदेश दिलेला नाही, अशी माहिती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT