सोनोग्राफी सेंटर्सची होणार तपासणी pudhari photo
सोलापूर

Solapur News : सोनोग्राफी सेंटरची होणार काटेकोर तपासणी

पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन झाल्यास थेट गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र कायद्याची राज्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि बेकायदेशीर गर्भलिंग निदानाला आळा बसण्यासाठी आरोग्य विभागाकडून धडक कारवाईचे मोहीम हाती घेतली आहे.

या मोहिमेत सर्जिकल स्ट्राइक द्वारे खासगी सोनोग्राफी सेंटरवर कारवाई केली जाणार आहे. राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निर्देशानुसार राज्यस्तरीय अधिकाऱ्यांचे पथक येथील शहर जिल्ह्यातील खासगी सोनोग्राफी सेंटरवर अचानक छापे टाकून त्याची झाडाझडती घेतली जाईल. व पुणेतील कुटुंब कल्याण कार्यालयाच्या आरोग्य उपसंचालकांनी १२ जून रोजी शहर व बार्शीतील विविध खासगी सोनोग्राफी सेंटरला अचानक भेटी देऊन तपासणी केली आहे.

या पुढे येणार्‍या काळातही अशा प्रकारे अनेक ठिकाणी असलेल्या सोनोग्राफी सेंटरला अचानक भेटी देत तेथील स्थानिक प्राधिकारी यांच्यासमवेत पाहणी केली जाईल. तसेच येथील सोनोग्राफी सेंटरला नियमितपणे भेटी दिल्या जातील. पीसीपीएनडीटी या कायद्याचे उल्लंघन झाल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही. अशा प्रकारचा इशारा आरोग्य सेवा उपसंचालकांकडून दिला आहे. तपासणी मोहिमेत आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी सोबत असणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT