सोलापूर : सोलापूरच्या विमानसेवेसंदर्भात प्रलंबित प्रश्नांवर केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली.  
सोलापूर

Solapur Flight Update : होटगी रोड विमानतळावर लवकरच नाईट लँडिंग

पालकमंत्री गोरेंनी घेतली केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मोहोळ यांची भेट

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : होटगी रोड विमानतळावरून नाईट लँडिंग सुरू करण्याची मागणी असतानाच नाईट लँडिंगसह बोरामणी विमानतळ भूसंपदानाच्या प्रश्नांवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोमवारी (दि. १७) दिल्लीत केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली. यावेळी सोलापूरच्या विमानसेवेविषयी सविस्तर चर्चा झाली.

मागील सव्वा वर्षापासून सोलापुरातून मुंबई, गोवा विमान सेवा सुरू आहे; परंतु विमानतळावरील धावपट्टी, परिसरातील अतिक्रमण, सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी यामुळे नाईट लँडिंगसाठी मर्यादा आहेत. सुरक्षित आणि नियमित विमानसेवेसाठी नाईट लँडिंगची आवश्यकता आहे. त्यासाठी सुमारे १६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यात मजरेवाडी, कुमठे हद्दीतील जागा संपादन करावी लागणार आहे.

या विषयांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. बोरामणी येथे ३३ हेक्‍टर जागा संपादन केल्यानंतर केवळ ४०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे; परंतु या विमानतळाच्या विकासासाठी वन विभागाच्या जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे. माळढोक पक्ष्यांमुळे अधिवासामुळे सध्या हे प्रकल्प प्रलंबित आहे.

तिरूपती, हैदराबाद विमानसेवेबाबतही चर्चा

सोलापूर-मुंबई विमानसेवा सध्या आठवड्यातून दोनच दिवस सुरू असून ती आठवड्यातील सातही दिवस सुरू राहावी यासाठी चर्चा झाली. सोलापूर-हैदराबाद आणि सोलापूर-तिरूपती विमानसेवा सुरू करण्याच्या मागणीबाबत पालकमंत्री गोरे यांनी राज्यमंत्री मोहोळ यांच्याशी चर्चा केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT