सोलापूर : जिल्ह्यात ग्रामविकास अधिकाऱ्यांची २०१ पदे रिक्त आहेत. त्यामुळे अनेक ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे बऱ्याच गावांचा कारभार देण्यात आला आहे. त्यामुळे गावचा कारभार हाकताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. ३१ ऑगस्ट २०२६ अखेरच्या आकडेवारीनुसार जिल्हाभरात मंजूर असलेल्या ९५१ पदांपैकी तब्बल २०१ पदे रिक्त आहेत. त्यामुळे अनेक ग्रामसेवकांकडे विविध गावांचा अतिरिक्त्त पदभार देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांपैकी माळशिरस आणि बार्शी तालुक्यात सर्वाधिक रिक्त पदे आहेत. माळशिरस तालुक्यात ३४ तर बार्शी तालुक्यात ३१ पदे रिक्त आहेत. त्यामुळे या तालुक्यातील विविध गावांचा पदभार एकाच ग्रामसेवकांकडे दिल्याची समोर समोर आली आहे.
ग्रामपंचायत अधिकारी संवर्गात एवढ्या मोठ्या प्रमाणात पदे रिकामी असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. तसेच ग्रामीण भागातील विकासकामे आणि प्रशासकीय अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत असून, ही रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याची मागणी होत आहे.
तालुकानिहाय रिक्त पदे
अक्कलकोट : २३, कुर्डूवाडी : २१,
बार्शी : ३१, मोहोळ : १८, करमाळा : २५, माळशिरस : ३४, मंगळवेढा : १०,
उत्तर सोलापूर : ९, पंढरपूर : ९,
सांगोला : १६, दक्षिण सोलापूर : ५
असे एकूण २०१ पदे रिक्त आहेत.