Govindpur murder case Pudhari
सोलापूर

Govindpur murder case: गोविंदपूर हत्याकांड; संशयित आरोपींना महाराष्ट्रातून घेतले ताब्यात

पोलिसांनी दिली प्राथमिक माहिती; मृतांवर चडचण येथे अंत्यसंस्कार

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : कर्नाटकात भीमाकाठावरील गोविंदपूरमध्ये शेतजमिनीच्या वादातून सहाजणांची गोळ्या झाडून व धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. या खूनप्रकरणी 12 जणांवर चडचण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील काही आरोपींना महारष्ट्रातून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

दुंडप्पा रेवणसिद्धप्पा निराळे (वय 65), शिवपुत्र रेवणसिद्धप्पा निराळे (58), चंद्रकांत रेवणसिद्धप्पा निराळे (55), राहुल शिवपुत्र निराळे (25), समर्थ शिवपुत्र निराळे (23), शब्बीर बाबूसाब अत्तार (45, सर्व रा. चडचण, जि. विजयपूर) अशी मृतांची, तर अरविंद यशवंत कटगे (वय 72, रा. दसूर, ता. मंगळवेढा), जेसीबी चालक संदीप भारत माने (33, रा. कात्राळ, ता. मंगळवेढा, सोलापूर) अशी जखमींची नावे आहेत. या हत्याकांड प्रकरणी चैतन्यकुमार दुंडप्पा निराळे यांनी चडचण पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार गोविंदपूर येथील कल्लणगौडा ईश्वरगौडा पाटील यांच्यासह 12 जणांना आरोपी करण्यात आले आहे.

अप्पूगौडा लगमण्णगौडा पाटील, ईश्वरअप्पा लगमणगौडा पाटील, प्रकाश बसवराज मास्तर, प्रशांत ऊर्फ परुगौडा बसवराज मास्तर, सिद्धाराम कल्लणगौडा पाटील, लायप्पा मेणप्प्ाा बिरादार, चिदानंद नामदेव कोळी, महासिद्ध श्रीमंत बिरादार, श्रीमंत शंकरेप्पा बिरादार, शंकरेप्पा महादेव अरकेरी (सर्व रा. गोविंदपूर) आणि आप्पासाहेब शंकर भोई (रा. भंडारकवठे, ता. दक्षिण सोलापूर, सध्या गोविंदपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. घटनेनंतर उत्तर विभागाचे आयजीपी संदीप पाटील आणि जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान यातील काही आरोपींना महाराष्ट्रातून अटक करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

शनिवारी मृतांचे विजयपूर येथे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनानंतर चडचण येथे शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत निराळे कुटुंबातील सदस्यांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. शब्बीर अत्तार यांच्यावर मुस्लिम धर्मीय परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT