Petrol Diesel  Pudhari
सोलापूर

Fuel shortage Solapur: सोलापुरात 7 दिवस पुरेल इतकेच इंधन शिल्लक

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती; पाकणीतील डेपोत सतत इंधनाचा पुरवठा सुरूच

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर शहर, जिल्ह्यासाठी येत्या आठ दिवस पुरेल इतकाच इंधनाचा साठा शिल्लक आहे. असे असले तरी पाकणी डेपोत मुंबईतून तेलाचा मोठ्या प्रमाणात सतत इंधनाचा पुरवठा सुरूच आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून नये, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी केले.

जिल्ह्यासाठी प्रती दिवसासाठी पेट्रोल 624 केएल व डिझेल 1240 केएल इतक्या इंधनाची आवश्यकता भासते. सध्या 26181 केएल पेट्रोल, 45770 केएल डिझेलसाचा साठा शिल्लक असल्याचीही पुस्ती जिल्हाधिकाऱ्यांनी जोडली. पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी घेतली. जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांना एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीएल या तेल कंपन्यांच्या डेपो मॅनेजर व विक्री अधिकारी यांची व्ही.सी.द्वारे आढावा बैठक घेण्याचे आदेश दिले होते.

...तर दररोज 22 कोटींची बचत होईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनास जिल्हावासीयांनी प्रतिसाद देऊन दररोज किमान एक टक्का जरी इंधन बचत केली, तर दररोज 22 कोटी रुपये बचत होऊ शकतात. ग्राहकांनी स्वयंशिस्तीने बचतीचे उपाय योजल्यास नक्कीच इंधन बचतीला फायदा होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT