ट्रॅक्टर विक्रीच्या व्यवहारातून ४४ लाखांची फसवणूक; दोघांवर गुन्हा file photo
सोलापूर

Solapur News : ट्रॅक्टर विक्रीच्या व्यवहारातून ४४ लाखांची फसवणूक; दोघांवर गुन्हा

फौजदार चावडी पोलिस ठाण्यात नोंद

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : ट्रॅक्टर खरेदीच्या व्यवहारात ठरलेली रक्कम न देता त्‍यातून ४४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गौरव पोपट बोदरे (रा. पुरंदर, पुणे) व पुष्कर शंकर पाराडे (रा. उत्कर्षनगर, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नाव आहेत. काशीनाथ मनोहर घुगरे (रा. भवानी पेठ, सोलापूर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्‍यांचे शहरातील बाळे येथे श्री ट्रेडर्स नावाचे शेतीचे व एस ट्रॅक्‍टरचे शोरूम आहे.

गौरव बोदरे व पुष्कर पाराडे यांनी त्‍यांच्‍या शोरूममधून ८६ लाख ३२ हजार रुपयांचे १३ ट्रॅक्‍टर सह्याद्री ट्रॅक्‍ट्रर अँड इक्‍विपमेंट येथे नेऊन विकले. त्‍या बदल्यात ४१ लाख २९ हजार रुपये दिले. उरलेले ४४ लाख २ हजार दिले नाहीत. मे २०२४ ते जुलैदरम्‍यान वेळोवळी उरलेली रक्‍कम घुगरे यांनी मागितली; परंतु संशयित आरोपींनी रक्‍कम परत न देता केवळ आश्वासने दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच घुगरे यांनी पोलिसांत धाव घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT