सोलापूर

Chemist strike Solapur: जिल्ह्यात चार हजार औषध विक्रेत्यांचा संप

अत्यावश्यक सोयीसाठी 16 दुकाने सुरू

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या या संपात शहर- जिल्ह्यातील चार हजाराहून अधिक दुकानदारांनी सहभाग घेऊन कडकडीत बंद पाळला. दरम्यान, शहरातील अत्यवस्थ रुग्णांसाठी सोळा मेडीकल दुकान सुरू होती.

सध्या देशात ऑनलाईन औषध विक्री वाढलेली आहे. याच औषध विक्रीच्या विरोधात देशातील साडेबारा लाख मेडीकल धारकांनी आज बुधवार रोजी संप पुकारला होता. या संपात येथील शहर जिल्ह्यातील संघटनाही सहभागी झाली.

बंद काळात औषध विक्रेता संघटनेने हेल्पलाइन सुरू ठेवली होती. तालुकास्तरावरही काही दुकाने उघडी ठेवून रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी नियोजन केले होते. भविष्यात या ई- फार्मसीचा दूरगामी परिणाम होणार असल्याने सर्वच दुकारांनी हा लढा पुकारला होता.

ऑनलाईन औषध खरेदी-विक्रीची पद्धत सोयीची वाटत असली तरी त्याचे भविष्यातील धोकेही तेवढेच घातक आहेत. याचा विचार करू संघटनेने हे आंदोलन पुकारले होते. या बंद काळात रूग्णांचीही आम्ही काळजी घेतली.
- व्यंकटेश पुजारी, जिल्हाध्यक्ष औषध विक्रेता संघटना सोलापूर
प्रचलित औषधांच्या विक्रीत रूग्णहित सामावले आहे. चुकीची औषधे दिल्यास कारवाई अटळ असते, हे आम्हाला माहित आहे. म्हणून, प्रचलित औषध विक्रीच्या दुकानातून चुकीची एकही औषध दिली जात नाही.
- सिध्दाराम चाबुकस्वार, औषध विक्रेता सोलापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT