सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत २२ कोटी ५० लाखांच्या विकासकामांची निविदा काढली आहे. यातून सोलापूर, वाडी, कुर्डूवाडी व भाळवणी स्थानकांचे दोन टप्प्यांत आधुनिकीकरण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ७. ५ कोटी खर्चून आकर्षक प्रवेशद्वार, पार्किंग, ड्रेनेज व लँडस्केपिंग केले जाईल. तर दुसऱ्या टप्प्यात ७. ६१ कोटींतून जुन्या इमारतींची दुरुस्ती व नूतनीकरण होणार आहे.
हायटेक सुविधा
वाडी, कुर्डूवाडी व भाळवणीत २.५४ कोटींतून विश्रामगृह होईल. काँक्रिट कचरा कुंड्यांसाठी २.६५ कोटींची तरतूद केली आहे. तसेच, सोलापूर व दुधनीतील कर्मचारी निवासस्थानांच्या देखभालीसाठी २ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
दिव्यांगांना विशेष सोय
अमृत भारत योजनेचा मुख्य उद्देश स्थानकांचे सिटी सेंटर व रूफ प्लाझामध्ये रूपांतर होणार आहे. जुन्या सुविधांचा विकास करतानाच दिव्यांग नागरिकांसाठी विशेष सोयी उपलब्ध करून दिल्या जातील.