सोलापूर

Solapur Accident : सोलापूरात दोन वेगवेगळ्या अपघातात चार ठार, सात जण जखमी

backup backup

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : सोलापूर-पुणे महामार्गावरील कोंडी पुलाजवळील उतारावर तसेच हिप्परगा येथील फूट रस्ता येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात चारजण ठार झाले. कोंडीजवळील अपघात सायंकाळी पाच तर फूट रस्ता येथील अपघात रात्री ७.४५
वाजताच्या दरम्यान घडला. दोन्ही अपघातात सातजण जखमी झाले. (Solapur Accident)

भैरव्वा शिवयोगी हांडे (वय ५५, रा. मित्रनगर, शेळगी), विहान मयूर कांगडे (वय १२, रा. अंधेरी, मुंबई) अशी कोंडीजवळील अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तसेच शरीफा असिफ शेख (वय ३५, रा. तळेहिप्परगा, सोलापूर) व सलीमा बशीर चौधरी (वय ५०, रा. गणेश हिंगणी, पुणे) या दोघी फूट रस्ता येथील अपघातात ठार झाल्या. (Solapur Accident)

चैतन्य ऊर्फ बबलू कांगडे (वय ४५), लक्ष्मी बागडे, मयूर कांगडे, रतन कांगडे व वेदांत चैतन्य कांगडे (वय १२) तसेच असिफ आमीन शेख (वय ४०, रा. तळेहिप्परगा ), शिवयोगी हांडे (वय ६५, रा. मित्रनगर, शेळगी) अशी जखमींची नावे आहेत. देगाव रस्त्यावरील आमराई भागात चैतन्य कांगडे यांच्या घराच  बांधकाम सुरू आहे. सध्या सुट्ट्या असल्याने शनिवारी ते कुटुंबातील सदस्यांसह मुंबईहून सोलापूरकडे निघाले होते. त्यांच्यासोबत भाऊ मयूर, आई रतन, बहीण लक्ष्मी, मुलगा वेदांत व पुतण्या विहान असे कारमध्ये होते. सायंकाळी पाकणी
ओलांडून त्यांची कार कोंडीच्या दिशेने निघाली होती. पाकणी आणि कोंडीदरम्यान असणाऱ्या पुलाच्या उतारावर त्यांच्या कारचे टायर फुटले. यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून कार पुढील दुचाकीला धडकली. तेव्हा दुचाकीवरील शिवयोगी व भैरव्वा हांडे हे पती-पत्नी खाली पडले. यात भैरव्वा या गंभीर जखमी होऊन मृत पावल्या. दरम्यान कार दुभाजकाला धडकल्याने कारमधील विहान मयूर कांगडे (वय १२) हा मुलगा जखमी होऊन ठार झाला, तर रतन कांगडे यांच्या डोक्याला मार लागला आहे. या अपघातातील इतर जखमींवर खासगी तसेच शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान फूट रस्ता येथे सायंकाळी साडेसहा वाजता सोलापूर ते तळेहिप्परगा असे दुचाकीवरून ट्रिपल सिट जाणारे असिफ अमिन शेख यांच्या दुचाकीला डंपरने पाठीमागून धडक दिली. या भीषण अपघातात शरीफा असिफ शेख (वय ३५, रा. तळेहिप्परगा, सोलापूर) व सलीमा बशीर चौधरी (वय ५०, रा. गणेश हिंगणी, पुणे) या दोघी जागीच ठार झाल्या तर असिफ हा जखमी झाला आहे. असिफ आणि शरिफा हे दोघे पती-पत्नी आहेत तर सलीमा या शरिफा यांच्या आत्या होत. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.

SCROLL FOR NEXT