Job Scam Pudhari
सोलापूर

Solapur Job Fraud: नोकरीच्या अमिषाने पाच लाखांची फसवणूक; दोन पोलिसांवर गुन्‍हा

एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : मुंबई पोलीसात भरतीचे आमिष दाखवून पाच लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन पोलिसांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रंजीत दशरथ भोसले (रा. विजय रेसिडेन्सी, न्यू पाच्छा पेठ, सोलापूर, नेमणूक : मोहोळ पोलीस स्टेशन, सोलापूर ग्रामीण) आणि सचिन बाळकृष्ण पाटोळे (मुंबई पोलीस) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. बापू दशरथ भोसले (वय ५७, रा. गोंधळे वस्ती, न्यू शिवाजी नगर, सोलापूर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

संशयीत रंजीत भोसले आणि सचिन पाटोळे यांनी बापू यांचा मुलगा अजय याला मुंबई पोलीसात भरती करून देतो, असे आश्वासन देऊन जुलै २०२१ ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत एक लाख रुपये ऑनलाईन व चार लाख रोख घेतले. पण नोकरी दिली नाही. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिपरिक्षक येळे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT