सोलापूर

Solapur Fire Incident : डी-मार्टसमोर फळ दुकानांना आग

जुळे सोलापूर डी-मार्ट समोर दोन फळविक्रीच्या दुकानांना आग लागल्याची घटना शुक्रवारी घडली

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : जुळे सोलापूर डी-मार्ट समोर दोन फळविक्रीच्या दुकानांना आग लागल्याची घटना शुक्रवारी घडली. या आगीत दोन्ही दुकानांचे नुकसान झाले, तर शेजारील कॅन्टीन आणि परिसरातील मोठ्या वृक्षांनाही आगीची झळ पोहोचली. घटनेची माहिती मिळताच उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्‍निशमन दलाचे अधीक्षक राकेश साळुंखे यांनी जवानांसह सुमारे अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली.

उपमहापौर देवकर यांना काही नागरिकांनी आगीच्या घटनेची माहिती दिली. त्यांनी तत्काळ अग्‍निशमन अधीक्षक साळुंखे यांच्याशी संपर्क साधून अग्‍निशमन दलाला पाचारण केले. त्यानंतर अग्‍निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचे काम सुरू केले. डी-मार्टसमोरील सुधाकर कोरे यांच्या फळविक्रीच्या दुकानात प्रारंभी आग लागली. त्यानंतर ही आग पसरून पुढील ग्रीन शेडपर्यंत पोहोचली. शेजारील जइद बागवान यांच्या फळविक्रीच्या दुकानालाही आग लागली. बाजूला असलेल्या कॅन्टीनलाही आगीची झळ पोहोचली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT