निमगाव : शक्तीपीठ महामार्गाला माळशिरस तालुक्यात विरोध वाढू लागला आहे, निमगाव मगर येथे शेतकऱ्यांसह महिलांनी अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहता मोजणी अधिकारी आणि पोलीसांनी तेथून माघार घेतली आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
शक्तिपीठ महामार्गाची मोजणी करण्यासाठी शुक्रवार, दि.५ रोजी निमगाव मगर येथे पोलिस बंदोबस्तात आधिकारी सकाळी ६ वाजता आले होते. याची माहिती शेतकऱ्यांना मिळताच त्यांची या मोजणीला आक्षेप घेतला. पाेलिस बळाचा वापर करु लागले असता महिलांनी अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यात तरुण शेतकऱ्यांनीही अंगावर पेट्रोल ओतून घेतले. तसेच मोगणी यंत्र हिसकावून घेतले.
यावेळी पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापटी झाली. यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. अखेर पोलिस आणि मोजणी अधिकारी यांना नमते घ्यावे लागले. मोजणी थांबवून अधिकारी माघारी गेले.