Solapur Sugarcane Farmers 
सोलापूर

Solapur Sugarcane Farmers : उसाला प्रति टन चार हजार रुपये दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी

हक्काच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचा एल्गार; सर्व पक्षीय नेतेमंडळींना गावबंदी

पुढारी वृत्तसेवा

मोडनिंब : जाधववाडी (ता. माढा) गावात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. सीना-माढा उपसा सिंचन योजनेच्या लघु वितरिका क्र. ८ (आठ नंबर कॅनॉल)चे पाणी गावाला मिळत नसल्याने पिके जागीच जळून गेली आहेत.

गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने मिरची, लिंबू आणि इतर फळबागांची लागवड केली होती. मल्चिंग पेपर अंथरून, ठिबक सिंचन करून लाखो रुपये खर्च केले. मात्र टेलवर असलेल्या जाधववाडीला पाणीच न आल्याने मल्चिंगवरची मिरचीची पिके वाळून गेली आहेत. लिंबूच्या बागा सुकून फक्त काटक्या उरल्या आहेत. जमिनीला भेगा पडल्या असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. आम्ही कोणाकडे भीक मागत नाही, आमच्या हक्काचे पाणी मागत आहोत. उजनीचे पाणी आमच्या डोक्यावरून पुढे जाते पण आमच्या शेतात येत नाही. नेतेमंडळी फक्त आश्वासन देतात, अशा संतप्त भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.

जाधववाडी (ता. माढा) गावात ८ नंबर कॅनॉलचे पाणी मिळत नाही, तोपर्यंत सर्व पक्षातील नेत्‍यांना गावबंदी करण्याचा आक्रमक निर्णय जाधववाडी ग्रामस्थांनी घेतला आहे. गावाच्या प्रवेशद्वारावरच याबाबतचा मोठा फलक लावण्यात आला आहे. आत्मदहन करण्याचा इशारा शासनाला दिला होता. परंतु अधिकाऱ्यांनी शब्द दिल्याने आम्ही आत्मदहनाचा निर्णय मागे घेतला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

जोपर्यंत ८ नंबर कॅनॉलचे पाणी मिळत नाही, तोपर्यंत सर्व पक्षातील नेतेमंडळींना जाधववाडीत प्रवेश बंद, आमचे प्रश्न सुटत नाहीत, तोपर्यंत सर्व शासकीय कार्यालये-जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत, दवाखाने व इतर सर्व कार्यालये बंद राहतील, येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार असेल, अशी भूमिका सर्व ग्रामस्थांनी घेतली असल्याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT