hanging case Pudhari News Network
सोलापूर

Solapur Farmer Death : पीक-पाणी नसल्याने मी जीवन संपवत आहे!

करंजेतील शेतकऱ्याने चिठ्ठी लिहून राहत्या घरामध्ये घेतला गळफास

पुढारी वृत्तसेवा

करमाळा : पीक-पाणी नसल्याने मी आत्महत्या करत आहे... असा मजकूर चिठ्ठीत लिहून करमाळा तालुक्यातील सीना नदीकाठच्या करंजे गावच्या शेतकऱ्याने राहत्या घरामध्ये गळफास घेत आत्महत्या केली. संतोष सीताराम लावंड (वय ५०) असे दुष्काळामुळे आत्महत्या करणाऱ्या या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. भाऊसाहेब लावंड यांचे ते लहान भाऊ आहेत.

संतोष लावंड हे करंजे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांच्या नावावर एक एकर शेती आहे. दुष्काळामुळे त्यांचे पीक वाया गेल्याने नैराश्य आले. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. मात्र, शासनाच्या वेळ काढूपणामुळे त्यांना आर्थिक मदत मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी गुरुवारी दुपारी साडेबारा वा. घरात आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी संतोष यांनी पॅंटच्या खिशामध्ये चिठ्ठी लिहून ठेवली होती. उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर करंजे येथे शेतामध्ये संतोष यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. करमाळा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

संतोष यांनी लिहिलेला चिठ्ठीतील मजकूर

मी संतोष सीताराम लावंड रा. करंजे, तालुका करमाळा पूर्ण शुद्धीत लिहितो आहे की, मी दुष्काळी शेतीशी निगडित मजूर असून, पीक पाणी नसल्याने स्वतः आत्महत्या करीत आहे. घरच्यांना अथवा कोणालाही याबाबत जबाबदार धरू नये, ही विनंती. - एस. एस. लावंड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT