न्यूरोसर्जन डॉ. शिरीश वळसंगकर Pudhari Photo
सोलापूर

Dr. Shirish Valasangkar Death Case : डॉ. वळसंगकर यांच्या मृत्यूनंतर कुटुंबात कलह

सून डॉ. शोनाली आणि जावई फडके यांच्‍यात मारामारी; परस्‍पर विरोधात तक्रार दाखल

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : डॉ. शिरीष वळसंगकर यांच्‍या आत्‍महत्‍येनंतर त्‍यांच्‍या कुटुंबातील वाद शिगेला पोहोचला आहे. आत्‍महत्‍या झाल्यानंतर घराबाहेर पडलेल्या सून डॉ. शोनाली वळसंगकर यांनी पुन्‍हा घरात येण्याचा प्रयत्‍न केल्यावर त्‍यांच्‍यात आणि जावई सुजय फडके यांच्‍यात जोरदार झटापट झाली. दोन्‍ही बाजूंची लेखी तक्रार सदर बझार पोलिस ठाण्यात दाखल झाली असून अजून गुन्‍हा दाखल झालेला नाही.

रामवाडी गोदाम परिसरातील डॉ. वळसंगकर रुग्णालयाच्‍या वरच्‍या मजल्यावर डॉ. आश्विन वळसंगकर व डॉ. शोनाली वळसंगकर राहात होते. डॉ. शोनाली या घरातून निघून गेल्यानंतर गुरुवारी (दि. १८) पुन्‍हा घरात राहण्यासाठी आल्या. यावेळी डॉ. शिरीष यांचे जावई सुजय फडके यांनी डॉ. शोनाली यांना घरात येण्यास मज्‍जाव केला. दोघांमध्ये झटापट झाली. डॉ. शोनाली आणि सुजय यांच्‍यातील भांडण मारामारीपर्यंत पोहोचले. यामध्ये दोघांनाही किरकोळ लागले. डॉ. वळसंगकर रुग्णालय ही खासगी मालमत्ता आहे. यामध्ये डॉ. शोनाली यांचा काही संबंध नाही, त्‍यांनी इथे येऊ नये, असे सुजय फडके यांनी सांगितले. तर मी या घरची सून आहे, त्‍यामुळे मी इथे येणारच, असा रेटा डॉ. शोनाली यांनी लावला.

दरम्‍यान डॉ. शोनाली यांनी थेट पोलिसांना पाचारण केले. त्‍यामुळे प्रकरण सदर बझार पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले. दोघांनीही एकमेकांविरोधात तक्रार दिली. परंतु अद्याप याबाबत कोणताही गुन्‍हा दाखल करण्यात आलेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT