Accident News  pudhari photo
सोलापूर

Solapur Accident: स्कूल बसच्या धडकेत कारखान्याच्या कामगाराचा मृत्यू

होटगी रस्त्यावर हॉटेल साईप्रसाद ढाब्याजवळ स्कूल बस आणि दुचाकी वाहनाची जोरदार धडक होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाला

पुढारी वृत्तसेवा

दक्षिण सोलापूर : होटगी रस्त्यावर हॉटेल साईप्रसाद ढाब्याजवळ स्कूल बस आणि दुचाकी वाहनाची जोरदार धडक होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाला.

पीरप्पा भिमशा व्हनचेंजे (वय ४५, रा. होटगी, ता. दक्षिण सोलापूर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. पीरप्पा व्हनचेंजे हे सिद्धेश्वर साखर कारखान्यात कामाला होते. ड्युटी ऑटोपून ते घराकडे निघाले होते. श्री सिद्धेश्वर प्रशालेची स्कूल बस विद्यार्थी घेऊन शाळेकडे निघाली होती. हॉटेल साईप्रसाद ढाबा जवळ स्कूल बस (क्र. एम.एच. १३ इ.पी. ५०५७) आणि दुचाकी (एम.एच. १३ जे. ३४२८) यांची समोरासमोर जोरदार धडक होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाला.

सुदैवाने या घटनेमध्ये बसमधील विद्यार्थ्यांना कोणती इजा झाली नाही, मात्र विद्यार्थी घाबरून गेले होते. घटनेची खबर पोलिसांना कळविताच वळसंग पोलिस ठाणे अंकित विडी घरकुलच्या पोलिसांनी येऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्‍हिल हॉस्पिटलला पाठवला. येथूनच दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख एका कार्यक्रमासाठी निघाले होते, त्यांनी तत्काळ गाडीतून उतरून घटनेची माहिती घेतली आणि पोलिसांना सूचना केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT