Solapur News: रात्रीचा पाणीपुरवठा सुरळीत करा, जुन्या ड्रेनेज लाईन बदला Pudhari
सोलापूर

Solapur News: रात्रीचा पाणीपुरवठा सुरळीत करा, जुन्या ड्रेनेज लाईन बदला

आमदार सुभाष देशमुख यांच्या महानगरपालिका प्रशासनाला सूचना

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : शहर व हद्दवाढ भागातील रात्रीचा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा. तसेच 30 ते 35 वर्षांपासून जुन्या झालेल्या ड्रेनेज लाईन व पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन बदलण्याची कार्यवाही गतीने करावी, अशा स्पष्ट सूचना आ. सुभाष देशमुख यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या.

विभागीय कार्यालय क्र. 5 येथे झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी शहरातील मूलभूत सुविधांबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. बैठकीस महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, उपायुक्त आशिष लोकरे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्यासह संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते. शहरातील आर.टी.ओ. रोड, माशाळ नगर, दाते नगर, टाकळीकर मंगल कार्यालय रोड, निलम नगर, ढोबळे नगर, जमादार वस्ती आदी भागांतील रस्त्यांवरील ड्रेनेज चेंबरची पातळी बिघडल्याने अपघात होत असल्याची बाब आमदारांनी निदर्शनास आणून दिली. संबंधित चेंबर समतल करून तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश दिले.

शहर व हद्दवाढ भागातील अनियमित पाणीपुरवठ्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत सकाळ व रात्रीच्या सत्रातील पुरवठा नियमित करण्याचे निर्देश देण्यात आले. मुख्य व अंतर्गत रस्त्यांची नियमित स्वच्छता, नवीन एलईडी लाईट बसविणे व देखभाल कामे पूर्ण करणे, नगरोत्थान योजनेअंतर्गत विविध भागांत ड्रेनेज लाईन टाकणे याबाबतही स्पष्ट सूचना देण्यात आल्या..

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT