सोलापूर

Solapur News: इलेक्ट्रिक सिटीबसेसचा आजचा मुहूर्त चुकला; केवळ तीनच बस दाखल

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सोलापूर महापालिकेकडून १०० इलेक्ट्रिक सिटीबस सोलापुरात आणण्यात येणार आहेत

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सोलापूर महापालिकेकडून १०० इलेक्ट्रिक सिटीबस सोलापुरात आणण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात म्हणजे १७ ऑगस्टला १७ सिटीबस आणण्यात येणार आहेत. सध्या मात्र केवळ तीनच बस दाखल झाल्या आहेत.

रेल्वेच्या मालवाहतूक गाडीतून भगव्या रंगाच्या १७ इलेक्ट्रिक सिटी बसेस दाखल होतील. उर्वरित बस टप्प्याटप्प्याने डिसेंबरअखेरपर्यंत दाखल होणार असल्याची माहिती महापौर विनायक कोंड्याल यांनी दिली. शहरात १०० इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यासाठी महापालिकेने जेबीएम कंपनीशी करार केला आहे.

सिटीबसविषयी विशेष तपशील

l प्रत्येक सिटीबस दिवसभरात किमान १८० किलोमीटर फिरेल

l सर्व बसेसची जेबीएम कंपनीकडे २०३७ पर्यंत मालकी असेल

l जेबीएमला महापालिकेकडून प्रति किलोमीटर २३ रुपये मोबदला यासाठी सोलापुरात ५० स्मार्ट सिटी बसस्टॉप निर्माण होणार

l सर्व सिटीबस स्टॉपवर सौरऊर्जा सुविधा असणार

l सिटीबस स्टॉपवर एका बाजूला खासगी कंपन्यांच्या, तर उर्वरित दोन बाजूंना महापालिकेच्या जाहिराती असणार

l या सर्व जाहिरातींचा मक्ता नवी दिल्लीतील लोटस कंपनीकडे

l कंपनी प्रत्येक बसस्टॉपसाठी दरमहा १५०० रुपये रेंट देणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT