सोलापूर : येत्या पावसाळ्यावर एल निनोचे संकट ओढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. धरणातील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. जून आणि जुलै महिन्यांत पावसात खंड पडण्याची शक्यता वर्तविले आहेत. त्या पार्श्वभूमीवर 31 ऑगस्टपर्यंत उपलब्ध पाण्याचा अंदाज लक्षात पिण्याच्या पाण्याचा नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानूसार जिल्हयात सन 2025-26 या वर्षातील टंचाई कृती आराखड्यामध्ये 246 गावे व 599 वाड्या- वस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
त्यासाठी अंदाजित खर्च रक्कम 1204.1 लक्ष इतका आहे. सन 2023 -24 टंचाई कालावधी अंतर्गत 214 टँकरद्वारे 180 गावांत 1273 वाडया- वस्त्यांवर पाणीपुरवठा करण्यात आला होता. सन 2024-25 टंचाई कालावधी अंतर्गत 69 टँकरद्वारे 59 गावांत 587 वाड्या- वस्त्यांवर पाणीपुरवठा करण्यात आला होता.
सन 2025-26 या वर्षातील टंचाई कृती आराखड्यामध्ये 178 टँकरद्वारे 147 गावांत 589 वाडया, वस्त्यांवर पाणीपुरवठा करणे प्रस्तावित असून मार्च अखेर 48 टँकर प्रस्तावित असताना एकही टँकरची मागणी आली नाही. सद्यस्थितीत 11 एप्रिलपासून उत्तर सोलापूर तालुक्यात रानमसले गावामध्ये एक टँकर चालु आहे. सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्यातील वसंतराव नाईकनगर, बार्शी तालुक्यातील भोयरे, पिंपरी आणि माळशिरस तालुक्यातील पळसमंडळ येथे असे एकूण 4 टँकर प्रस्तावित आहेत.