सोलापूर

सोलापूर : ‘दुष्काळ जाहीर करा’ बैलांच्या अंगावर लिहून केली मागणी; पोळा सणावर दुष्काळाचे सावट 

backup backup

उत्तर सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : उत्तरा नक्षत्राचे आगमन झाले असून अद्यापही दमदार पावसाची आस कायम आहे. खरिपाचा हंगाम वाया गेला असून बळीराजासाठी वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्जा-राजाचा सण अर्थात पोळ्यावरही झाल्याचे दिसून आले. बैल पोळा हा सण श्रावण अमावास्येला साजरा केला जातो.

सोलापूर जिल्ह्यासह उत्तर सोलापूर तालुक्यात यावर्षी दुष्काळसाचे सावट असल्याने बैलपोळा सण शेतकऱ्यांनी साधेपणाने साजरा केला. बैलांच्या सजावटीसाठी साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला नाही. दुष्काळाचा परिणाम यावर्षी बाजारपेठेत साहित्य खरेदी साठी गर्दी कमी असल्याचे बघायला मिळाली, त्यातच सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याचे देखील दरवाढ झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.

यंदा शेतीसाठी समाधानकारक पाऊस

न झाल्याने शेतकरी वर्गात नाराजी असून भाजीपाला व शेती मालाला देखील चांगला बाजारभाव न मिळाला असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. आधुनिक शेतीकडे जरी शेतकरी वळाला असला तरी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या अंगणात गाय आणि बैल असावे म्हणून त्यांचा सांभाळ करतांना दिसतात. शेतकऱ्यांचा सोबती असलेल्या बैलांबाबत कृतज्ञता व्यक्त
करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. पोळा सणाच्या आदल्या दिवशी व पोळा सणा दिवशी सकाळपासून गाय-बैलांना आंघोळ घातली जाते. त्यानंतर शिंगांना (एगुंळ) ऑइल पेंट लावून रंगीबेरंगी कलरने रंगरंगोटी, कंडेगोंडे, अंगावर झूल घातली जाते. याशिवाय बैलांना गुळ, तेल पाजत, खिचडी खाऊ घातली जाते.याशिवाय घरासमोर व शेतात गाय व बैलाची शेतकऱ्याच्या कुटुंबाने पूजन करत
हरभऱ्याची डाळ आणि गुळापासून बनवलेले त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालत आणि हीच पुरणपोळीनंतर बैलांना चारत पूजन केले. तर अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बैलावर लिहून दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे.

बैलांची मिरवणूक

उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज, मार्डी, वडाळा, व इतर गावात पोळा सणा दिवशी बैलांच्या त्यांच्या शिंगांना छान रंग देत, अंगावर झूल घालत रंगीबेरंगी कलर व शेंगांना बेगड्या चिटकवल्या होत्या. डोक्याला बाशिंग आणि गळ्यात घुंगरांची माळ घालत, यादिवशी नवीन वेसण, म्होरकी, कंडा बैलांना घालून सजवले होते. बैलांची पूजा करून ढोल-ताशांच्या गजरामध्ये बैलांची मिरवणूक काढण्यात आली होती.

दुष्काळ जाहीर करा बैलावर लिहून मागणी

दुष्काळाचे सावट यावर्षीच्या बैलपोळा सणावर असून नान्नज (ता.उत्तर सोलापूर ) येथील शेतकरी सतीश अर्जुन गवळी या शेतकऱ्याने बैलावर लिहून' दुष्काळ जाहीर करावा' अशी मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT