Vijaykumar Deshmukh 
सोलापूर

Solapur Politics: मालकांचा रूसवा जाईना

'डीपीसी'ला गैरहजर, उद्योगमंत्र्यांसोबत मात्र हजर

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : मागील पाच टर्म शहर उत्तर विधानसभेतून निवडून आलेले आ. विजयकुमार देशमुख गटात सध्या खदखद पाहायला मिळत आहे. या खदखदीतून सोशल मीडियावरुन चर्चा रंगली आहे.

शनिवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आ. देशमुख हे निमंत्रित सदस्य असल्याने त्यांची उपस्थिती अपेक्षित होती परंतू ते गैरहजर राहिल्याने त्यांचा रूसवा अजून गेला नाही का, अशी चर्चा आहे. शिवसेना शिंदे गटाचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या शनिवारच्या दौऱ्यात होटगी मठात त्यांच्यासोबत आ. देशमुख उपस्थित होते. २०२४ ला भाजपाची सत्ता येऊनही सोलापूर जिल्ह्याला मंत्रीपद मिळाले नाही. भाजपाने आ. देवेंद्र कोठे यांना शहरातील राजकारणात तर ग्रामीण भागात आ. सचिन कल्याणशेट्टी यांना बळ दिले.

दरम्यान एकसंघ भाजपात गटबाजी व कुरघोडीचे राजकारण पाहायला मिळत आहे. मंत्री सामंत यांनी होटगी मठात काशी जगदगुरु डॉ.मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी यांचे आशीर्वाद घेतले. त्यांच्यासोबत आ. देशमुख असल्याने त्यांनी शिंदे शिवसेनेची जवळीक साधल्याची चर्चा रंगली होती. याबाबत सोशल मीडियावर अनेकांनी मते व्यक्त करताना आ. देशमुख पक्षांतर्गत गटबाजीला वैतागले आहेत का,एस. असा प्रश्न उपस्थित केला.

आगामी निवडणुकीची उत्सुकता

महापालिका निवडणुकीत आ. विजयकुमार देशमुख यांच्या समर्थकांचे तिकीट कापल्याचा आरोप झाला. बाळे येथील देशमुख समर्थक कार्यकर्त्यांनी नुकताच थेट शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. तर काहीजण सन २०२९ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत वेगळे चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

आ. देशमुखांचा तो व्हिडीओ व्हायरल

आ. विजयकुमार देशमुख यांनी दोन दिवसांपूर्वी अधिवेशनात मुंबईमध्ये आपल्या मतदारसंघाबाबत काय समस्या मांडल्या आहेत. याबाबत माध्यम प्रतिनिधींने प्रश्न विचारल्यानंतर आ. देशमुख यांनी तुला काय करायच आहे, तू सोलापूरचा आहे का, असा उत्तर देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावरुन व्हायरल केले जात आहे. दरम्यान देशमुख समर्थक आणि विरोधकांकडून ट्रोल केले जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT