Women Harassment Case Pudhari
सोलापूर

Solapur dowry harassment: हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

माहेरून 10 लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी एका विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात समोर आली

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : माहेरून 10 लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी एका विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात समोर आली आहे.

याप्रकरणी पत्नी रितीका राकेश मोतीवाले (रा. उत्तर सदर बाजार, लष्कर) यांनी दि. 15 रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी पती राकेश मोतीवाले, सासू आणि सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विवाहितेच्या छळाची ही घटना डिसेंबर 2024 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत स्वागत नगर येथील सासरी घडली. सासरच्या मंडळींनी फिर्यादीला पैशांच्या मागणीवरून वारंवार शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपींनी संगनमत करून तिला उपाशी ठेवणे, अपमानित करणे आणि चांरित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ केला.

छळ व जाचाला कंटाळून अखेर विवाहितेने पोलिसांत धाव घेतली व फिर्याद दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, पोलीस हवालदार वाघमोडे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT