Devendra Kothe Pufhari
सोलापूर

Devendra kothe | सोलापुरातील दोन एमआयडीसींसाठी 56 कोटींचा निधी मंजूर : आ. देवेंद्र कोठे

अक्कलकोट व होटगी रोड वसाहतींना होणार लाभ

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : अक्कलकोट व होटगी रोड औद्योगिक वसाहतींमध्ये (एमआयडीसी) पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 56 कोटी रुपयाची निधी राज्य शासनाने मंजूर केल्याची माहिती आ. देवेंद्र कोठे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्य शासनाने औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक पायाभूत सुविधा निर्मिती व विकास ही योजना उद्योग विभागामार्फत सुरू केली आहे. निधी वितरणाच्या सुकाणू समितीची बैठक मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 13 वी बैठक दि. 13 मार्च रोजी झाली. यात सोलापूर महानगरपालिकेने सादर केलेल्या अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीतील 35 रस्ते व सोलापूर सहकारी औद्योगिक वसाहत होटगी रोड, या औद्योगिक वसाहतीतील नऊ रस्ते डांबरीकरणाच्या कामाकरीता अनुक्रमे 50 कोटी 22 लाख 95 हजार 561 रुपये तर 5 कोटी 71 लाख 39 हजार 512 असे एकूण 55 कोटी 94 लाख 35 हजार 73 रुपये मंजूर करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे हा निधी मंजूर झाल्याने औद्योगिक वसाहतीमधील विकास कामांना चालना मिळणार आहे. रस्त्यांची कामे झाल्याने दळणवळणाची सुविधा उपलब्ध होणार आहे, असे कोठे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस महापौर विनायक कोंड्याल, पेंटप्पा गड्डम, राजू राठी आदी उपस्थित होते.

अक्कलकोट रोड एमआयडीसीत होणार रस्ते

अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीतील 35 रस्ते डांबरीकरणासाठी राज्य शासनाचा 75 टक्के म्हणजे तर जिल्हा नियोजन व विकास योजनेचा हिस्सा 12.5 टक्के, महापालिकेचा हिस्सा 12.5 टक्के मिळून 50 कोटी 22 लाख 95 हजार 561 रुपये निधी मंजूर झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT