डॉ. शिरीष वळसंगकर pudhari photo
सोलापूर

तपास सीआयडीकडे सोपवा

Doctor death : वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांबरोबरच सोलापूरकरांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर ः न्युरो फिजिशिअन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येला पंधरा दिवस झाले. या हायप्रोफाईल केसचा तपास गुन्हे शाखेकडे न देता सदर बझार पोलिसांकडेच ठेवला. त्यास आता पंधरा दिवस उलटले तरी तपासात ठोस असे काहीच हाती लागले नाही, असे समजते.

प्रचंड हुशार, शांत आणि संयमी असलेल्या डॉ. शिरीष यांनी नेमकी आत्महत्या कोणत्या कारणासाठी केली, त्याच्या आत्महत्येस नेमके कोण जबाबदार यासह अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवावा, अशी मागणी सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रातून तसेच सोलापूरकरांमधून होत आहे.

सोलापूराचे वैद्यकीय क्षेत्र हे राज्यात अग्रेसर आहे. या क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञाचा मृत्यू अशाप्रकारे होत असेल तर त्याचा सर्वांगाने तपास होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी नाव न छापण्याच्या अटीवर केली आहे.

ज्यांनी हजारो पेशंटचे प्राण वाचविले, शेकडो लोकांना रोजगार दिला, सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्राचे नाव एका उंचीवर नेले अशा डॉ. शिरीष यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्या आत्महत्येस जबाबदार कोणीही असो, त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या सोबत आता सर्वसामान्यांमध्येही या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे सोपवावा, अशी चर्चा सुरू झाली आहे.

काही प्रश्न अनुत्तरितच

  • संशयित आरोपी मनीषा मुसळे-मानेशिवाय आणखी कुणी मास्टर माईंड या प्रकरणात आहे काय?

  • डॉ. शिरीष यांच्या तणावाला कौटुंबिक कलह कारणीभूत असे मनीषाचे म्हणणे कितपत खरे

  • खरोखरच डॉक्टरांच्या कुटुंबात कलह होता का, असल्यास त्याचे प्रेशर डॉ. शिरीष यांच्यावर होते का?

  • हॉस्पिटलमध्ये डॉ. शिरीष आणि सून डॉ. शोनाली यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू होती, त्याचा या आत्महत्येशी संबंध आहे का?

  • आत्महत्येप्रसंगी डॉ. शिरीष यांच्या घरामध्ये कोण-कोण उपस्थित होते?

  • डॉ. शिरीष यांनी बाथरूममध्ये गोळी झाडून आत्महत्या केली; परंतु पिस्टल बेडरूममधील बेडवर कसे ?

  • डॉ. शिरीष यांना हॉस्पिटलमध्ये नेण्या अगोदरच त्यांच्यावर कुणी प्रथमोपचार केले

  • मनीषा यांनी केवळ व्यथा मांडली, या एका कारणावरून डॉक्टर आत्महत्या करू शकतात का?

  • घटनास्थळी आढळलेल्या चिठ्ठीवर डॉ. शिरीष यांची सही त्यांची नाहीच, हा दावा खरा की खोटा

  • डॉ. शिरीष तसेच मनीषा यांच्याशिवाय इतरांच्या मोबाईलचे सीडीआर तपासण्यात आले आहेत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT