सोलापूर जिल्‍हा मध्यवर्ती सहकारी बँक 
सोलापूर

Solapur News : दीपावलीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी

प्रारूप मतदार यादी होणार सोमवारी जाहीर; यादीकडे जिल्‍ह्याचे लागले लक्ष

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर जिल्‍हा मध्यवर्ती सहकारी बँकेची प्रारूप मतदार यादी येत्‍या सोमवारी (दि. २१) जाहीर होणार आहे. १४ ऑक्‍टोबरला मतदारांची अंतिम यादी जाहीर होणार असल्‍याचे ऐन दीपावलीत जिल्‍हा बँकेच्‍या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे.

निवडणुकीसाठी १ जुलै २०२६ हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला आहे. यावर आधारित प्रारूप मतदार यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर मतदार यादीवर हरकती व सूचना मागविण्यात येतील. मतदार यादी अंतिम झाल्यानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होईल. दरम्‍यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदार यादी हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्यामुळे प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यामध्ये कोणत्या संस्था व मतदारांचा समावेश आहे, कोणत्या नावांवर हरकती दाखल होतात आणि त्यावर काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

१४ ऑक्‍टोबरला होणार अंतिम यादी प्रसिद्ध

निवडणूक प्रक्रियेतील कार्यक्रमानुसार २१ ते ३० सप्टेंबरदरम्यान प्रारूप मतदार यादीवर हरकती दाखल करता येणार आहेत. दाखल झालेल्या हरकतींची छाननी करून त्यावर ९ ऑक्टोबर रोजी अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

मतदार यादी कार्यक्रम असा

प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध : २१ सप्टेंबर

हरकती व सूचना : २१ ते ३० सप्टेंबर

हरकतींवर अंतिम निर्णय : ९ ऑक्टोबर

अंतिम मतदार यादी प्रसिद्धही : १४ ऑक्टोबर

नेत्‍यांकडून तयारीला सुरुवात

अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी पुढील निवडणूक कार्यक्रमाकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागणार आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या अखेरीपासूनच संभाव्य उमेदवार, सहकारी संस्था आणि विविध राजकीय नेत्‍यांकडून निवडणुकीची तयारीला वेग येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT