सोलापूर

Solapur District Bank Election : सोलापूर जिल्‍हा बँकेसाठी ८६.९४ टक्‍के मतदान

अक्‍कलकोटमध्ये सर्वाधिक १००, उत्तर सोलापूर मतदान केंद्रावर सर्वात कमी ७१.२५ टक्‍के मतदान

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर जिल्‍हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्‍या नऊ संचालकांसाठी गुरुवारी (दि. २६) शहर-जिल्‍ह्यात अकरा केंद्रांवर ८६.९४ टक्‍के मतदान झाले. अक्‍कलकोट मतदान केंद्रावर सर्वाधिक १००, तर उत्तर सोलापूर मतदान केंद्रावर सर्वात कमी ७१.२५ टक्‍के मतदान झाले. सांगोला मतदान केंद्रावरील तक्रार वगळता इतर दहा मतदान केंद्रांवर व्‍यवस्‍थित मतदान प्रक्रिया पार पडली.

दरम्‍यान, आज शुक्रवारी (दि.२७) हैदराबाद रोडवरील सहकारमहर्षी वि. गु. शिवदारेअण्णा सभागृहात सकाळी आठ वाजल्‍यापासून मतमोजणी होणार आहे. बँकेच्‍या १९ संचालक मंडळापैकी दहा संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित नऊ जागांसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली असून, यामध्ये भाजप पुरस्‍कृत समविचारी सहकार पॅनेल की मोहिते-पाटील गटाच्‍या स्‍वाभिमानी शेतकरी सहकार पॅनेलचे उमेदवार बाजी मारणार याचे चित्र आज शुक्रवारी (दि.२७) दुपारपर्यंत स्‍पष्ट होईल.

तालुकानिहाय मतदान टक्‍केवारी

अक्‍कलकोट : १०० बार्शी : ९६.२६ करमाळा : ८६.६७ माळशिरस : ९५.६५ माढा : ७३.४६, मंगळवेढा : ९३.४४ मोहोळ : ९०.६७ पंढरपूर : ८८.०३ सांगोला : ९६.८३ उत्तर सोलापूर : ७१.२५ दक्षिण सोलापूर : ९०.४६

३३९ मतदारांनी फिरविली पाठ

जिल्‍हा बँकेच्‍या निवडणुकीसाठी दोन हजार ५९६ मतदान पात्र आहेत. त्‍यातील दोन हजार २५७ मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला. उर्वरित ३३९ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे आज झालेल्या मतदानातून स्पष्ट झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT