Solapur District Bank 
सोलापूर

Solapur District Bank Election : जिल्हा बँकेसाठी दोन हजार ५४९ मतदार पात्र

अंतिम यादी जाहीर : पंढरपूर, सांगोल्‍यातील ६५ संस्‍थांचा अंतिम यादीत समावेश

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : जिल्‍हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्‍या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी बुधवारी (दि.१४) जाहीर झाली आहे. त्‍यासाठी दोन हजार ५४९ मतदार पात्र झाले आहेत. यामध्ये पंढरपूर तालुक्‍यातील ४० दूध संस्‍था आणि सांगोल्‍यातील २५ संस्‍थेचा अंतिम यादीमध्ये समावेश आहे.

जिल्‍हा बँकेच्‍या निवडणुकीसाठी प्रारूप यादी जाहीर झाली होती. त्‍यामध्ये दोन हजार ४८५ मतदार पात्र होते. त्‍यातील अक्‍कलकोट तालुक्‍यातील एक दूध संस्‍था अपात्र ठरली. तर सांगोला तालुक्‍यातील ‘अ’ वर्गातील एक संस्‍था वाढली. तसेच ‘ई’ वर्गातील ११, ‘क’ वर्गातील एक आणि ‘ड’ वर्गातील १२ अशा तर पंढरपूर येथील २५ संस्थांचा अंतिम मतदार यादीत समावेश झाला आहे. त्‍यामुळे जिल्‍हा बँकेच्‍या निवडणुकीसाठी एकूण दोन हजार ५४९ मतदार पात्र ठरले आहेत. यामध्ये ३२१ वैयक्‍तिक मतदार असल्‍याची माहिती जिल्‍हा उपनिबंधक कार्यालयाने दिली आहे.

आणखी मतदार वाढण्याची शक्‍यता

माढा तालुक्‍यातील ६२ दूध संस्‍थांच्या मतदार यादीसह इतर तालुक्‍यातील मतदार यादीवर काही जणांनी आक्षेप घेत मुंबई उच्च न्‍यायालयाच्‍या कोल्‍हापूर खंडपीठात धाव घेतली आहे. त्‍यावर अद्यापही निर्णय झाला नसल्‍याची माहिती पुढे आली आहे. त्‍यामुळे तो निर्णय झाल्‍यानंतर अंतिम मतदार यादीमध्ये आणखी मतदार वाढण्याची शक्‍यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT