बार्शी; पुढारी वृत्तसेवा: सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सुर्डी येथील जिल्हा बँकेच्या शाखेवर भर दिवसा तीन दरोडेखोरांनी बंदूक व कोयत्याचा धाक दाखवत दरोडा टाकून लाखो रुपयांची रोकड लंपास केली. मात्र, पोलिसांच्या तत्परतेमुळे त्या तिन्ही दरोडेखोरांना कोरफळे गावात अटक करण्यात यश आले आहे.
दरोडेखोरांनी दरोडा टाकून पळून जाताना लुटलेल्या रोकडची बँग गावाबाहेर गेल्यानंतर रस्त्यावर टाकली. आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पळून जाणाऱ्या दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून लोकांनी बँकेसमोर मोठी गर्दी केली आहे.