Solapur District Loan Plan 
सोलापूर

Solapur District Loan Plan | कृषी : १७ हजार कोटींचा आराखडा

मागील वर्षीच्या १५३०० कोटी रुपयांच्या तुलनेत यामध्ये लक्षणीय वाढ

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या सन २०२६-२७ या वर्षासाठी २६ हजार १७० कोटी रुपयांचा वार्षिक कर्ज योजना आराखडा तयार करण्यात आला आहे. यात जिल्हा अग्रणी बँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार प्राधान्य क्षेत्रासाठी एकूण १७ २७० कोटींचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. मागील वर्षीच्या १५३०० कोटी रुपयांच्या तुलनेत यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

३१ मार्च २०२६ पर्यंत प्रत्यक्ष कर्जवाटप १६५६५.२५ कोटी इतके झाले असून हे लक्ष्याच्या १०८.२७ टक्के इतके यशस्वी साध्य झाले आहे. कृषी क्षेत्रासाठी एटीएल व एकूण कृषी क्षेत्र मिळून १०७७५.७५ कोटींचे तर एमएसएमई क्षेत्रासाठी ५५३० कोटींचे कर्जवाटप नियोजित करण्यात आले आहे, अन्य प्राधान्य क्षेत्रांसाठी ९६५ कोटींचे तर एकूण प्राधान्य क्षेत्रासाठी १७२७० कोटींचे नियोजन करण्यात आले आहे. बिगर प्राधान्य क्षेत्रासाठी ८९०० कोटींचे वाटप करून एकूण योजना २६१७० कोटी इतकी ठरविण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ यांनी दिली.

पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट २ हजार ८५८ कोटी

जिल्ह्यातील बँकांना खरीप हंगाम २०२६-२७ साठी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट २ हजार ८५८ कोटी असून जून २०२६ अखेरपर्यंत १ हजार ६५० कोटी इतके वाटप केलेले आहे, ते उद्दिष्टाच्या ५७ टक्के आहे. त्यामुळे प्राधान्याने पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्टपूर्ती करण्याचे निर्देश दिले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी पीक कर्ज वाटपसंदर्भात बँकांची बैठक घेतली असून, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत ऑनलाईन पोर्टलवर आठ बँकांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या सर्व संबंधित बँकांनी तक्रारींचे निवारण त्वरित करावे असे निर्देश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT