सोलापूर जिल्‍हा बँकेसाठी दिग्गजांनी घेतले अर्ज 
सोलापूर

Solapur DCC Bank : सोलापूर जिल्‍हा बँकेसाठी दिग्गजांनी घेतले अर्ज

आ. देशमुख, पाटील, माने, हसापुरे आदींचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी बँकेच्या १९ संचालक मंडळासाठी निवडणूक लागली आहे. अर्ज विक्रीच्‍या पहिल्‍याच दिवशी म्‍हणजे सोमवारी (दि.२६) आ. सुभाष देशमुख, माजी आ. राजन पाटील, दिलीप माने, जयवंतराव जगताप, सुरेश हसापुरे यांच्‍यासह अनेक दिग्गज नेत्‍यांनी अर्ज खरेदी केले.

पहिल्‍या दिवशी विक्रमी अर्जांची विक्री झाल्‍याने बँकेच्या निवडणुकीत चुरस निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, एकही उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्‍याची माहिती जिल्‍हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी दिली.

अर्ज खरेदी करणार्‍यांमध्ये नगरसेवक जयकुमार माने, जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज माने, बाजार समितीच्या माजी सभापती इंदुमती अलगोंड, भारत जाधव, मनीष देशमुख, कल्याणराव काळे, अजिंक्यराणा पाटील, विक्रांत पाटील, सिद्धाराम चाकोते, सिद्धेश्वर अवताडे, बबन अवताडे, सुशील अवताडे, श्रीदीप हसापुरे, मारुती लवटे आणि शंभूराजे जगताप आदींनी अर्ज खरेदी केले. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३० ऑक्टोबरपर्यंत आहे. छाननी आणि उमेदवारी माघारीच्या प्रक्रियेनंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.

निवडणूक बिनविरोधसाठी प्रयत्‍न

निवडणूक बिनविरोधसाठी महायुतीमधील नेत्यांचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा होण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीकडून तयारी

खा. धैर्यशील मोहिते-पाटील आणि माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या बँकेची निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. त्‍यामुळे निवडणूक बिनविरोध करण्यास महायुतीला यश येणार का, असा प्रश्न उपस्‍थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT