Solapur district bank Pudhari File Photo
सोलापूर

Solapur DCC Bank Election : भाजप ‘समविचारी’ला कपबशी, ‘स्‍वाभिमानी’ला शिट्टी

डीसीसी बँक निवडणूक : सफरचंद, छत्री, नारळ, बॅटरी, ट्रॅक्‍टर चिन्‍हाचे वाटप

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : जिल्‍हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लागली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून बुधवारी (दि.१८) भाजप समविचारी सहकार पॅनलला कपबशी तर मोहिते-पाटील गटाच्‍या स्‍वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलला शिट्टी चिन्‍ह वाटप केले. या दोन प्रमुख पॅनलसह इतर उमेदवारांना विविध चिन्‍हांचे वाटप करण्यात आले आहे.

जिल्‍हा बँकेच्‍या नऊ संचालक मंडळाच्‍या जागेसाठी २२ उमेदवार निवडणुकीच्‍या रिंगणात आहेत. त्‍यातील भाजप समविचारी सहकारचे नऊ आणि मोहिते-पाटील स्‍वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलच्‍या आठ असे एकूण सतरा उमेदवार कपबशी आणि शिट्टी चिन्‍ह मिळाले आहे.

उर्वरित उमेदवारांसाठी स्‍वतंत्र चिन्‍हे देण्यात आली आहेत. यामध्ये माळशिरस येथील सोसायटी मतदारसंघातील ज्ञानराज पाटील यांना ट्रॅक्‍टर, सांगोला सोसायटी मतदारसंघातील संजय इंगोले यांना खटारा, मोहोळ तालुक्‍यातील नीता गुंड यांना बॅटरी, पंढरपूर येथील रुक्‍मिणी रणदिवे यांना सफरचंद, सोलापूर शहरातील श्रीधर कोंडले यांना छत्री, दक्षिण सोलापूर येथील राजेंद्र गंगदे यांना नारळ चिन्‍ह वाटप करण्यात आले आहे.

शिट्टी वाजणार की कपबशी जिंकणार

जिल्‍हा बँकेच्‍या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बुधवारी चिन्‍हाचे वाटप केले. भाजप समविचारी सहकार पॅनलला कपबर्शी तर मोहिते-पाटील गटाच्‍या स्‍वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलला शिट्टी चिन्‍ह मिळाले आहे. त्‍यामुळे बँकेच्‍या निवडणुकीत शिट्टी वाजणार की कपबशी जिंकणार, अशी राजकीय चर्चा रंगू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT