Solapur District Bank 
सोलापूर

Solapur DCC Bank Election : 'डीसीसी'च्या निवडणुकीचे वाजले बिगुल

२६ नोव्हेंबरला मतदान : सोमवारपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्‍या बहुप्रतिक्षित संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला आहे. बँकेच्या १९ संचालक पदांसाठी ही निवडणूक पार पडणार असून, सोमवारी (दि.२६ ऑक्टोबर) पासून प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार असून, २६ नोव्‍हेंबरला मतदान होणार आहे.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे आणि निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्कीट बेंचच्या निर्देशानुसार हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

दरम्‍यान, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर गेल्या काही काळापासून प्रशासक होते. मुंबई उच्च न्यायालयात दाखल रिट याचिकेवर झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाच्या आदेशानुसार ही निवडणूक घोषित करण्यात आली आहे. या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील सहकार आणि राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडींना उधाण आले असून विविध राजकीय पक्षांचे आणि शेतकरी संघटनांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

निवडणुकीचे वेळापत्रक

l अर्ज दाखल करणे : २६ ते ३० ऑक्टोबर

l दाखल अर्जांची यादी प्रसिद्ध : ३० ऑक्टोबर

l उमेदवारी अर्जांची छाननी : ०२ नोव्हेंबर

l वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध : ०३ नोव्हेंबर

l उमेदवारी अर्ज मागे घेणे : ०३ ते १७ नोव्हेंबर

l उमेदवारांची अंतिम यादी : १८ नोव्हेंबर

l चिन्‍हांचे वाटप : १८ नोव्हेंबर

l मतदान दिनांक : २६ नोव्हेंबर

l मतमोजणी व निकाल : २७ नोव्हेंबर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT