Solapur District Bank 
सोलापूर

Solapur DCC Bank Election : आ. कल्‍याणशेट्टी, म्‍हेत्रे, पाटील, पवारांसह ५४ जणांनी भरला अर्ज

डीसीसी बँक निवडणूक; अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : जिल्‍हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सोमवार (दि. २६) पासून सुरू झाली आहे. आतापर्यंत ५१६ अर्जांची विक्री झाली आहे. मागील तीन दिवसांत ६९ जणांनी अर्ज दाखल केले. आज गुरुवारी (दि. २९) आ. सचिन कल्‍याणशेट्टी, माजी आ. सिद्धाराम म्‍हेत्रे, भाजपचे नेते शहाजी पवार, प्रथमेश म्‍हेत्रे, अजिंक्‍यराणा पाटील, विक्रांत पाटील, रणजितसिंह शिंदे, मनीष देशमुख, अमोल शिंदे, अस्‍मिता गायकवाड यांच्‍यासह तब्‍बल ५४ जणांनी अर्ज दाखल केले. शुक्रवार (दि. ३०) शेवटचा दिवस आहे. उर्वरित नेते उद्यापर्यंत अर्ज दाखल करणार आहेत.

माळशिरस तालुक्‍यातून अद्यापही एकही अर्ज दाखल करण्यात आला नाही. त्‍यामुळे शेवटच्‍या दिवशी माळशिरस तालुक्‍यासह जिल्‍ह्यातील अनेक मातब्‍बर नेते अर्ज दाखल करण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

शुक्रवारी अर्ज भरण्याचा शेवटच्‍या दिवस आहे. त्‍यामुळे गुरुवारी आ. राजेंद्र राऊत, रूपमती दीपकआबा साळुंखे-पाटील, सूर्योदय दीपकआबा साळुंखे-पाटील, मीलन कल्‍याणशेट्टी, रणवीर राऊत, संगीता कल्‍याणराव काळे, प्रणव परिचारक, शिवाजी कांबळे, उमेश परिचारक, संजय कोकाटे, भारत शिंदे यांच्‍यासह १०८ जणांनी अर्ज खरेदी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT