सोलापूर

Solapur Ujani Dam: थायलंडच्या टिनफाईल माशाची उजनीतील एन्ट्री धोकादायक

स्थानिक देशी माशांचे अस्तित्व धोक्यात

पुढारी वृत्तसेवा

करमाळा : उजनी जलाशयात स्थानिक प्रजातींच्या माशांव्यतिरिक्त आता परदेशी माशांचे दर्शन सातत्याने होऊ लागले असून यापैकी मांगुर, सकर या प्रजाती पर्यावरणाला हानिकारक ठरत आहेत. अशाच एका जातीच्या माशाने उजनीत इन्ट्री केली आहे. टिनफाईल बार्ब असे या मासाचे नाव असून तो मूळचा थायलंड येथील आहे. हा मासा उजनी जलाशयात खानोटा येथे पहिल्यांदाच सापडला आहे.

फिश टॅन्कच्या माध्यमातून या माशाने जलाशयात प्रवेश केला असावा असा अंदाज आहे. फिश टॅंकमध्ये शोभेचा मासा म्हणून आणल्यानंतर त्याची वाढ झाल्यानंतर किंवा अन्य कारणाने त्याला नदी, नाल्यात सोडून दिले जाते आणि मग तो एखाद्या धरणात आश्रयास येतो असे दिसून येते.

स्थानिक मच्छीमार या माशाला ‘रुपेरी खवली’ या नावाने ओळखतात. खानोटा येथील अनिता नगरे व कैलास नगरे या मच्छीमार दांपत्याला उजनी पाणलोट क्षेत्रात खानोटा भागात हा मासा नुकताच चार बोटी जाळ्यात सापडला आहे. उजनीतील माश्यापैकी हा वेगळाच दिसत असल्याने याची उत्सुकता सर्वत्र लागली होती.

मात्र या माश्याची माहिती घेतली असता हा मासा परदेशी विशेषतः थायलंड येथे तसेच अग्नीये आशियात आढळून येत असल्याचे अभ्यासकानी सांगितले. स्थानिक प्रजातीसाठी हा मासा धोकादायक असल्याचे मत व्यक्त केले आहे. उजनी जलाशयात एका बाजूला रोहू, कटला, मृगल, मरळ , वांब सारखे देशी मासे कमी होत असताना, दुसऱ्या बाजूला चिलापी, सकर, टिनफाईल बार्ब सारखे विदेशी आणि शोभिवंत मासे झपाट्याने वाढत आहेत. हे धोक्याचे लक्षण आहे.

उजनीमध्ये व्यावसायिक माशांसोबतच विदेशी आणि शोभिवंत मासे वाढत आहेत, त्यामुळे उजनीच्या मत्स्यसंपदेमध्ये भर पडत आहे. प्रथमदर्शी हा मासा बार्ब या प्रजातीच्या समूहातील असावा असे वाटते, या माशाची निश्चित प्रजातीनिहाय ओळख पटवण्यासाठी काही नमुने घ्यावे लागतील.
-डॉ. रणजित मोरे, मस्य अभ्यासक, करमाळा
‘टिनफाईल बार्ब या माशाचे सिल्व्हर बार्ब या गोड्या पाण्यातील माशांची साम्य आहे. ते सुंदर दिसत असल्याने घरगुती 'फिश अक्वेरियम' मध्ये मोठ्या प्रमाणात पाळले जातात. हे मासे सुरुवातीला लहान असून कालांतराने एक ते दीड फुटांपर्यंत वाढतात. हे मासे मोठे झाल्यावर अक्वेरियममध्ये मुक्तपणे पोहता येत नसल्याने मत्स्यप्रेमी या माशांना नदी पात्रात वा जलाशयात सोडून देतात.
-डॉ. अरविंद कुंभार, प्राणिशास्त्राचे अभ्यासक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT