Water Supply Pudhari
सोलापूर

Solapur water supply project : पाणीपुरवठ्यासंदर्भात दिल्लीत सामंजस्य करार

सोलापूरच्या दररोज पाणीपुरवठ्याच्या स्वप्नाला जागतिक बँकेचे बळ

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर शहराला दररोज २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने आखण्यात आलेल्या एक हजार ३५० कोटी ६७ लाख रुपयांच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेसाठी शनिवारी दिल्लीत जागतिक बँकेसोबत सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे सोलापूरच्या पाणीपुरवठा व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा झाला.

या महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावेळी डेन्मार्कचे परराष्ट्रमंत्री लार्स लॉके रासमुसेन, भारतातील डेन्मार्कचे राजदूत रासमुस अबिल्डगार्ड क्रिस्टेनसेन, डॅनिश इंडस्ट्रीचे प्रतिनिधी जेकब हार्टिग फेबर, जागतिक बँकेचे आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी, महापौर विनायक कोंड्याल, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपस्थित होते.

जागतिक बँकेचे आर्थिक सल्लागार प्रविणसिंह परदेशी, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे तसेच सर्व संबंधित पदाधिकारी व अधिकारी यांच्यासह या सर्व मान्यवरांचे समस्त सोलापूरकरांच्या वतीने महापौर विनायक कोंड्याल यांनी आभार मानले.

दररोज पाणीपुरवठ्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याच्या ऐतिहासिक प्रक्रियेचा साक्षीदार होता आले. ही आनंदाची, अभिमानाची बाब आहे. सोलापूरकरांना दररोज पाणीपुरवठा करण्याचा संकल्प असून तो प्रत्यक्षात उतरविण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे.
- विनायक कोंड्याल, महापौर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT