Fraud Case file photo
सोलापूर

Solapur financial fraud: सीएसआर फंड मिळवून देण्याचे आमिष दाखवून ४० लाख रुपयांची फसवणूक

शिक्षण संस्‍थेसाठी ६० ते ७० कोटी रुपयांचा सीएसआर फंड मिळवून देतो, असे म्‍हणून एकाची ४० लाख रुपयांची फसवूणक झाल्याचा प्रकार उघडकीस आला

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : शिक्षण संस्‍थेसाठी ६० ते ७० कोटी रुपयांचा सीएसआर फंड मिळवून देतो, असे म्‍हणून एकाची ४० लाख रुपयांची फसवूणक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कामण्णा लक्ष्मण व्‍हनसुरे (वय ३५, रा. हंजगी, ता. अक्‍कलकोट, सध्या रा. सुभाष नगर, जुळे सोलापूर) असे फसवणूक झालेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

कामण्णा व्‍हनसुरे आणि संशयित आरोपी श्रीनिवास रेड्डे (रा. बेळगाव) यांची रिअल इस्‍टेट व्‍यवहरातून ओळख झाली होती. व्‍हनसुरे यांच्‍या नातेवाईकांच्‍या भैरवनाथ शिक्षण संस्‍थेसाठी ६० ते ७० कोटी रुपये सीएसआर फंड मिळवून देण्याचे आमिष दाखवले. सीएसआर फंड मिळाला नाही तर पेनल्‍टी म्‍हणून पाच कोटी रुपये देण्याचेही त्‍यांनी सांगितले. सीएसआर फंड मिळवण्यासाठी कंपनीचा स्‍लॉट खरेदी करण्यासाठी भाविक एक्‍सिम या खात्‍यावर ४० लाख रुपये पाठवण्यास सांगितले. त्‍यानंतर अकायडा ल्‍युमिनरी प्रा. लिमिटेड कंपनीच्‍या देवेंद्र यादव यांच्‍या बँक खात्‍यावर ते पैसे ट्रान्‍सफर केले. त्‍यानंतर विश्वास संपादन करण्यासाठी व्‍हनसुरे यांचा मित्र सुमित साळंके यांच्‍या नावे ४० लाखांचा डिमांड ड्राफ्‍ट रद्द केला.

व्‍हनसुरे यांना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्‍यांनी पोलिसांत धाव घेतली. त्‍यानुसार श्रीनिवास रेड्डे, भाविक एक्‍झिमचे खातेदारक, अकायडा ल्‍युमिनरी प्रा. लिमिटेड कंपनीचे देवेंद्र यादव आणि सुमित या चौघांविरोधात विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक तरंगे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT